-->

बुद्ध हे बुद्धीचे भांडार lyrics /Buddha he buddhiche bhandar lyrics


बुद्ध हे बुद्धीचे भांडार lyrics /Buddha he buddhiche bhandar

ज्ञान देउनी अज्ञानाचा दूर करी अंधार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

तत्त्व हिताची बोध प्रणाली 
वदे जगाला बुद्ध माउली 
सन्मार्गाची देई साउली 
करी धम्म साकार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

पुरुषोत्तम जणू दूत शांतीचा 
उद्धारक नव विश्व क्रांतीचा 
प्रेरक होऊनि हीन-दीनांचा 
करी जगी उद्धार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

नश्वर देही दिव्यत्वाने 
अष्टशीलेच्या उपदेशाने 
मानवतेला तथागताने 
दिला दिव्य आकार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

read also

Post a Comment

//oackoubs.com/4/4145780