-->

He Paani Anile Mi Math Bharuni lyrics | हे पाणी आणिले मी माठ भरुनी lyrics


हे पाणी आणिले मी माठ भरुनी lyrics / He Paani Anile Mi Math Bharuni lyrics

हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आनिले मी

नव्हे मानसं सारीच सैतान ही
भीमबाबा यांना नाही मुळी जाण ही
हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी
हे घोटभर जा हो पिऊनी

भर उन्हात व्याकूळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला
तो दाही दिशा पाही टक लावूनी
हे घोटभर जा हो पिऊनी

जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनि वाट पाहिली तोवर
तो प्राण सोडिला 'बाबा' म्हणूनी
हे घोटभर जा हो पिऊनी

बोले सोनबा भीमबाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील
तो धन्य, प्रभाकरा वाट पाहूनी
हे घोटभर जा हो पिऊनी

हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आनिले मी

शब्दरचना: प्रभाकर पोखरीकर
गायक: सोनू निगम

(बाबासाहेब या वाटेने येतील, तर तहानेले राहू नयेत, त्यांना पाणी मिळावे म्हणून सोनबा येलवे हे माठात पाणी घेऊन पनवेलजवळ रस्त्याच्या कडेला आयुष्यभर थांबले, त्यांच्यावर आधारित हे गीत आहे.)

read also

Post a Comment

//oackoubs.com/4/4145780