Ashi Kamal keli re Dada Ya bhimaichya Poran lyrics Buddha bhim geetmala

Ashi Kamal keli re Dada Ya bhimaichya Poran lyrics Buddha bhim geetmala

 
होत ओसडलेलं रान
कसं बहरून छान
भिमाची करणी बोले ही धरणी
जयभीम सन्मानानं..२
अशी कमाल केली रं दादा
भिमाई च्या पोरानं ॥ धृ 1

काल शिकायची होती बंदी
दिली भिमान नामी संधी
आज शिकायला पोरं पोरी
कसे जाती विदेशामंधी
राहायला माळी फिरायला गाडी
हाती मोबाईल फोन ..२
अशी कमाल केलीरं दादा ॥1 १ ॥

काल फाटकच लुगडं चोळी
माय घालायची रोज रोज
आज शालु पैठणी नेसून
कश्या करतात शिंगार साज
भिमाच देणं घालुन सोनं
फिरतात आलिशान ..२
अशी कमाल केलीरंदादा॥1२॥

काल लिहून ठेवलाय कायदा
आज साऱ्यांचा झालाय फायदा
पाहीन समाज सुटा बुटात
होता भीमान केलाय वायदा
असा कुणाचा जगात गौरव
केला का इतिहासानं ..२
अशी कमाल केलीरंदादा 1 ३॥

Ashi Kamal keli re Dada Ya bhimaichya Poran lyrics

#Anirudha vankar song lyrics
close