-->

प्रबुद्ध हो मानवा lyrics / prabuddha ho manava lyrics

प्रबुद्ध हो मानवा
प्रबुद्ध हो मानवा lyrics / prabuddha ho manava lyrics


कणाकणांनी ज्ञान वेचूनी प्रबुद्ध हो मानवा

प्रज्ञेचा हा प्रकाश दावील मार्ग तुला रे नवा
प्रबुद्ध हो मानवा

सिद्धार्थाच्या हृदयांतरी ही ज्ञानज्योत चेतली
बुध्दमुखाने ह्या ज्योतीची प्रभा जगी फाकली
त्या दीपाने तुही चेतवी, तव हृदयीचा दिवा
प्रबुद्ध हो मानवा

धम्म चिंतनी आचरणाची कळेल तुज संहिता
अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुध्दतीराच्या ----
पंचशीलेचा निवास हृदयी, निर्वाणास्तव हवा
प्रबुद्ध हो मानवा

मनोभूमितूनी तुझ्या रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा
त्या बागेची शीतल छाया लाभावी बहुजना
करुणाप्रेरित ज्ञान तुझे हे, संजीवन दे जीवा
प्रबुद्ध हो मानवा

read also

Post a Comment

//oackoubs.com/4/4145780