Chandan Vrukshasaman Hota lyrics | चंदन वृक्षासमान होता lyrics


घबराए जब मन अनमोल lyrics buddha bhim geet

चंदन वृक्षासमान होताभीमराव झिजला
जीवननौकेचा तो अमुच्यादीपस्तंभ ठरला

स्वानुभवाने दुःखे अमुचीजाणूनिया घेतली
विद्रोहाची फुले तयानेकरात आमुच्या दिली
संघटनेचा संघर्षाचा कानमंत्र हि दिला

महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले
महाडात ते तळे तयाने बंधमुक्त करविले
वैषम्याच्या बुरुज तटालासुरुंग हि लाविला

बहुज हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली
न्याय बंधुता समता नीतीतत्त्वे प्रतिपादिली
स्त्री-शुद्राच्या कल्याणाचाकायदाच घडविला
जीवननौकेचा तो अमुच्यादीपस्तंभ ठरला

Comments