थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी /hich aahe bhim wadi lyricsथांबवा जरा गाडी 
हीच आहे भीमवाडी
समता आणि शांतीने 
नांदती लाडी गोडी  

निढळाने जमवूनि पैसा 
बांधिले विहार 
दिसते दुरुनी घुमट 
चौरस्त्याच्या पार 
मिळुनी समाज सारा 
कष्ट करतो आळी पाळी  

जाऊ चला या तिकडे 
बुद्धाच्या विहारी 
जमले हे सान थोर 
नर आणि नारी 
बघा समता सैनिक दल 
फिरवितात लाठी काडी 

धम्म वंदनाहि होते 
सांज अन सकाळ  
कुणी भीम बुद्धाला 
अर्पि पुष्प माळ
मला ऐकू द्या आता 
अशोकाची वाणी थोडी 

Comments