कोण सकाळी पूर्व दिशेला lyrics buddha bhim geet

कोण सकाळी पूर्व दिशेला lyrics buddha bhim geetकोण सकाळी पूर्व दिशेला
स्वरांजली वाहिते (२)
गाऊनी भीम-बुद्धाची गीते (२)

कोण बरे शीलवंत ही देवी
गाई भीमाची मंजुळ ओवी
कोण माऊली भल्या पहाटे
अंगणी जल शिंपीते

पवित्र जलाने स्नान संपुनी
मिश्र फुलांचे हार गुंफुनी
कोण सुहासिन सौभाग्याचा
गंध-टिळा लाविते

कुणी हे मंगल मंत्र बोलले
बुद्धं सरणं वदत चालले
कोण विनयशील अमुची भगिनी
धम्मपदा वंदिते

जागे करुनी ह्या जनवृन्दा 
पहा निरखूनि काशीनंदा
कोण पुजारीन ह्या शुभसमयी
बुद्धपुजा बांधिते

कोण सकाळी पूर्व दिशेला
स्वरांजली वाहिते
गाऊनी भीम-बुद्धाची गीते

शब्दरचना:  बी. काशीनंद
close