-->

pimpalachya panavar pahile chitra gautamache lyrics Buddha bhim geetmala

पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
बोधिवृक्ष ने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
॥धृ1

किती घोर तपस्या ती
देहाचे वारूळ झाले
बुद्धयया अजिंठा ही
साक्षात वेरूळ आले
अष्टगाथा मंगलमय ते
पावित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
1 १॥

या सावलीत माझ्या
विश्वाची माऊली ती
हुदयात मानवाच्या
धम्म ज्योत लाविली ती
जग जिंकुनी झाले
ते मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
॥२॥

कधी केला नाही गर्व
ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो
मी बुद्धाचा चेला
बुद्धाने बुद्ध पाहे
सचित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
1३॥

लिहले कुठेच नाही
हा माझा धम्म आहे
निर्वाण पदानंतर
या जगी स्तुप आहे
भीम दूतास कळले ते
सन्मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे


pimpalachya panavar pahile chitra gautamache lyrics

read also

Post a Comment

//oackoubs.com/4/4145780