ramai dudha varchi saay pahili lyrics | रमाई दुधावरची साय पाहिली lyricsनवकोटी लेकरांची माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली

साहेब परदेशी, रमा उपवाशी
संसाराचा भार शिरी दरदिवशी
वाघाच्या जोडीला गाय पाहिली
वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली lyrics / ramai chya dudha varchi saay pahili lyrics
रमाई दुधावरची साय पाहिली

कष्टानं बाई तिनं नटविला संसार
विकुनिया गवऱ्या लावी हातभार
तिच्या ठायी संसाराची घाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली

ज्ञानसागराला ज्ञानाची भरती
शिकविले साहेबाला केली इच्छापूर्ती
कधी न मुखावर तिच्या हाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली

आभाळाचा पदर, आभाळाची छाया
आहे जगात अशी रमाईची माया
अशी न कुणाची कधी माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली

नवकोटी लेकरांची माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली

Comments