shilpkar jivnacha bhim maza hota lyrics / शिल्पकार जीवनाचा भीम माझा

shilpkar jivnacha bhim maza hota lyrics / शिल्पकार जीवनाचा भीम माझा

shilpkar jivnacha bhim maza hota lyrics / शिल्पकार जीवनाचा भीम माझा

शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे
रंजल्या न् गांजल्यांचा दीनदाता होता रे

फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर
दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर
आभाळागत छाया झाली स्वाभिमान दाता रे

खचलेल्या माणसाला ताठ त्याने केले
शोषितांच्या अस्मितेला खतपाणी दिले
उंचावली माननाही वाकणार आता रे

आसवांना दिली तू हक्काची रे भाषा
घटनेत जागविली न्यायाची रे आशा
बाणा तुझा होता न्यारा भाग्यविधाता रे
shilpkar jivnacha bhim maza hota lyrics

--- रमेश थेटे

close