ali jayanti jayanti lyrics
![]() |
ali jayanti jayanti lyrics |
आली जयंती जयंती
भिम माऊलीचा सण
अस्तुरीच्या साडीवर शोभे
पिंपळाच पान 1 धृ 1
पंचशिलेच्या रंगात
रंगलेली नवी धळी
पेटीमधूनी काढून
न्याहाळीते घडी घडी
सावळ्या मुखावर
उमटलं समाधान
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान 1 १ ॥
निळ्या निळ्या झेंड्यावाणी
सारे आसमंत निळे
भाऊ भावाच्या कपाळी
लवितात निळे टिळे
अंगणात पोरं पोरी
नाचतात आनंदानं
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान 1 २॥
ज्याच्या त्याच्या मुखावर
दिसे आनंदी आनंद
दरवळे चोहीकडे
सारा सुगंधी सुगंध
जणू मोहरून आलं
वसंताच माळरान
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान 1 ३ ॥
या अशा शुभ दिनी
दिवे लागणीच्या वेळी
विहाराच्या अंगणात
बसुनिया लेकी बाळी
काशीनंदा सवे गाती
बुद्ध भिमाईच गाणं
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान 1 ४ 1
आली जयंती जयंती
भिम माऊलीचा सण
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान
ali jayanti jayanti bhim maulicha san lyrics
Collection of inspirational, informative, educative and popular compositions on Buddha geetmala
This website is provide best quality bhim geet lyrics
LYRICS NODE